Skip to content

मंडळी नमस्कार

मी अनिरुद्ध अ. देसाई. या ब्लॉगवर आठवड्यातून किमान एकदातरी आपल्याबरोबर माझे भलेबुरे अनुभव, आठवड्यातील घटनांचे मी माझ्या अल्पमतीनुसार केलेले विश्लेषण, मी निर्माण केलेले व आत्तापर्यंत फारसे कुणी न वाचलेले गद्यपद्य वाड़मय इ. गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे.

मी मुळात चित्रकार. पुण्यातल्या अभिनव मधून कमर्शिअलचा डिप्लोमा पूर्ण केला. पुणे एअरपोर्ट वर माझे पेंटिंग्सचे एक एकल प्रदर्शन सुद्धा झाले आहे. परंतु माझा पोटापाण्याचा धंदा म्हणाल तर बिल्डिंग मॉडेल मेकिंग. १९८९ पासून छोट्यामोठ्या प्रमाणात मी हा उद्योग करीत आहे. शिवाय मला स्कल्प्चर, गार्डन डिझाईनिंग, कुकींग मध्येही रस आहे. कधीकधी या निमित्ताने सुद्धा आपण भेटू.

कविता/लेख लिहून मासिकांना, पेपरांना वगैरे पाठवायचे, छापून यायची वाट पहायची, छापला नाही तर त्रागा करायचा, या सगळ्या भानगडींपासून मुक्ती; शिवाय तुमचं स्वतःचं व्यासपीठ अशी ही ब्लॉगची संकल्पना मला खूप म्हणजे खुपच आवडली. म्हणून तर मी हा ब्लॉग चालू केला.

मला वाटतं नमनाला एवढं तेल पूरे, नाही का?

हो, आणि एक! हा ब्लॉग अस्तित्वात येणे आणि तो तुम्हा पर्यंत पोहोचणे या दोन्हींसाठी माझे मित्र श्री महेश देशपांडे हे कारणीभूत आहेत. त्यामुळे मला जे काही मिळेल त्यात त्यांचा वाटा आहेच.

Advertisements

Joke – किराणा

बाबुराव: काय गं? हल्ली किराण्याच्या पैशांसाटी माज्या म्हाग पैल्या सरका तगादा लावीत नाहीस?

बायको: तुम्ही रखमीच्या घरी किराणा भारता; आन तिचा नवरा आपल्या घरी. उगीच तुम्च्यावर

तरी दोन्ही कडचा बोजा कशाला? नाय का?

Joke – ओरीजनल औषध

पेशंट: काय हो डॉक्टरसाहेब तुम्ही जी औषधं देता  ती ओरीजनलच असतात ना?

डॉक्टर: का हो आसं का वाटलं तुम्हाला?

पेशंट: काहीच साईड ईफेक्ट होत नाही म्हनून म्हटलं?

डॉक्टर: ते सोडा पण आजारातून बरे तरी होताना?

पेशंट: ते खरंय पण मी घरच्याघरीच पुस्तकं वाचून आयुर्वेदीक वा होमिओपॅथीक औषधं

ट्राय करीत असतो.

हुरूप

नामदेवराव नुकतेच जागे झालेवते.दिस हातभर वर आला तरी भागी आजून उटा उटा करून माग लागली नव्हती.नाम्या बाजंवर उठून बसला तो गालातल्या गालात गुलुगुलू हासत होता.

भागी: काय वं कारभारी? तब्बेत बिब्बेत बरी हाय न्हवं.

नाम्या: बरी का चांगलीच हाय.चांगला हुरूप आल्यागत झालंय.

भागी:आस्सं? आवं काय श्रावन बिवन हाय का नाय? काल काय टाकून आलावता का का?

नाम्या:तसं नव्हं गं.

भागी:बर आसू द्या कसं बी. आता हुरूप आलाच हाय तर त्याला म्हनाव थांब जरा घडीभर तवर म्हसरास्नी कडबा घाला. धारा काडून घ्या. पानीबिनी पाजा.अंगुळ करून घ्या. अन् रानात जावा.तवर मी आलेच भाकरी घेवून . तुमच्या वंशाचा दिवा शेरडं घिवून रानात गेलाय Read more…

Joke – गुणाकार

मास्तर : बंड्या गाडविच्या तुज्या बानं आसा गुणाकार केलता का.

बंड्या : व्हय गुर्जी त्यानच केलंया हे गनीत.मी इचारलं तुमाला मास्तर

कोन व्हते. तर तुमचंच नाव घेतलं त्यानं.

Joke – पाच रुपयात पाव किलु त्याल

बायको: हि पाच रुपय घ्या आन पाव किलु गोडं त्याल आना.

बाबुराव:आग् काय याडबीड लागलं का? पाच रुपयात पाव किलु गोडं त्याल

येत आसतंय का?

बायको:हा हा येतय. त्या रखमिला त्याल आनुन दिलं तवा तिच्या कडनं पाचंच

रुपय घेतलं ना?

Joke – जीमिनींचे येव्हार

आमी : कसं काय बाबुराव जोरात दिसताय. काय उद्योग काय चाललाय सद्या.

बाबुराव:ह्योच की आपला जीमिनींचे येव्हार.

आमी : काय सांगताय? जीमिनी तरी रहायल्यात का गावात येव्हार करायला.

बाबुराव:खरयं. म्हनून तर हाय त्याच् जीमिनींचे चार चार येळा येव्हार करतो.

JOKE – दूध

ठमाकाकू: उद्यापास्न आर्धालिटरच दूध घालीत जावा. येक लिटर नको.

गवळी : चालंल. सांगतो तसं म्हशीला की ठमाकाकूस्नी आर्धालिटरच दूध पायजेल

तवा आर्धालिटर दूध कमी देत जा.

ठमाकाकू: म्हशीला सांगून कळणार नाही. त्यापेक्षा नळाला सांगा त्याला कळंल